राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली बुं. येथे दिनांक ७ आॅक्टोबर २०२० ला सकाळी शेतामध्ये कामासाठी गेलेल्या उपसरपंच मारोती नेव्हारे व दादांजी घोडमारे यांच्यावर जगली डुक्कराने हल्ला केला यात हे दोघेही जखमी झाले असून दोघांवरही वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. दरम्यान या परिसरात वाघाची दहशत पसरली असून सोमवारी खांबाळा बिटात वाघाने मारोती पेंदाम या शेतकऱ्याचा बळी घेत परिसरातील दहावा मानव बळी घेतला आहे. या वाघाने आतापर्यंत अनेक प्राण्यांचा फडशा पाडला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून वाघाला जेरबंद करण्यात अयशस्वी ठरत आहे. त्यातच आता जंगली डुक्कराच्या हल्ल्यातून मानव प्राण्यांना संरक्षण देण्याचे आवाहन वनविभागासमोर उभे ठाकले आहे. दरम्यान या नरभक्षक वाघा बरोबरच जंगली डुक्कराचा बंदोबस्त वनविभागाने लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Related Articles
शेतीविकास व ओबीसी विकास साधणारा अर्थसंकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
ओबिसींसाठी दहा लाख घरे बांधून देणार असल्याच्या घोषणेचे स्वागत चंद्रपूर : शिंदे फडणविस राज्य सरकारने आज (दि.९) ला सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्याचा सर्वांगीण विकास साधणारा हा अर्थसंकल्प आहे. शेती, मुली व महिला, अंगणवाडी सेविका, असंघटीत कामगार, आरोग्य क्षेत्र, ज्येष्ठ नागरीक, आदिवासी, ओबीसी, तथा नदीजोड, सिंचन, रस्ते आदी भौतिक सुविधांसाठी भरीव योजनांचा विचार […]
जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्ण ‘ऑनलाईन’
ई-ऑफिस प्रणाली मार्फत 12846 फाईल्स निकाली चंद्रपूर, दि. 22 : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्णपणे ऑनलाईन’ झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत 12846 फाईल्स निकाली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले. शासकीय कामकाज करतांना विविध विभागाच्या फाईल्स अनेक दिवस […]
मागण्यांची पुर्तता न केल्याने सिएसटिपीएसच्या विरोधात यंग चांदा ब्रिगेड वीज कामगार संघटनेचे आमरण उपोषण सुरु
साखळी उपोषणा दरम्याण इलेक्ट्रिक विभागाची कंत्राट प्रकिया पुर्ण करण्याचे आश्वासन देणा-र्या सिएसटीपीएस प्रशासनाने आश्वासनाची पुर्तता न केल्याने यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामागार संघटनेच्या वतीने सिएसटीपीएसच्या गेट समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यात नितीन कार्लेकर, अतुल बोढे, देवानंद गोलटकर, विक्की देवगळे उपोषणावर बसले आहे. चंद्रपूर महाओष्णीक विद्युत केंद्रातील इलेक्ट्रीक विभागाची कंत्राट निवीदा प्रक्रिया वेळेत पुर्ण न झाल्याने या […]



