महाराष्ट्र

मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण

मुंबई (मवृसे) मुंबईत करोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत असून येथील प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असणाèया विविध माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही करोना साथीने गाठले आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर आता अहवाल प्राप्त झाले असून त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध पत्रकार संघटनांच्या विनंतीवरून मुंबई महापालिकेच्या वतीने माध्यम प्रतिनिधींसाठी करोना चाचणी मोहीम घेण्यात आली होती. पालिकेच्या आरोग्य पथकाने एकूण १६८ जणांचे स्वॅब नमुने घेतले होते. यापैकी बहुतांश नमुन्यांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात ५३ जणांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आढळले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. करोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर व पत्रकारांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.