मुंबई (मवृसे) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या थांबताना दिसत नाहीत. राज्यात गेल्या १६ तासांत ५५ नवे कोरोना रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६९०वर गेली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज पुण्यात सर्वाधिक १७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये ३, औरंगाबादमध्ये दोन आणि मुंबईत २९ रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६९०वर गेली आहे. यात मुंबईत एकट्या धारावीतील करोना रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. तर पुण्यात दोन जणांचा करोनाने मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनाने दगावलेल्यांची संख्या ३४वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत एकूण ५२ रुग्ण बरे झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजेडोंबिवलीत चार महिलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात एक २४ वर्षीय महिला असून ही महिला करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिलाही करोनाची लागण झाल्याचं सूत्रांनी सांगितले. या चारही महिलांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये आज पाच जणांना करोनाची लागण झाल्याचं उघड झाले आहे. हे पाचही जण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन वर्षाच्या आणि ७ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाèयाच्या चालकालाही करोनाची लागण झाल्याने औरंगाबादच्या शासकीय कर्मचाèयांमध्ये चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल दोन करोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी रात्री उशिरा कळविण्यात आले. त्यात ४५ वर्षीय महिला आणि ३८ वर्षीय पुरुष (राहणार अनुक्रमे – आरेफ कॉलनी आणि बीड बाय पास) यांचा समावेश आहे. या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि बीड बायपास परिसरातील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एका खाजगी रुग्णालयात दाखल सात वर्षाची मुलगीही करोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

