वणी:(प्रति)(हेमंत थेरे): पहाटे चार ते पाचच्या सुमारास निलजई-घुग्गुस रोडवर सदर घटना घडली. यामध्ये मृतकाचे नाव जावेद शेख असून तो वणी शहरातील खलबडा येथील रहीवाशी आहे. सदर घटनेची नोंद शिरपुर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. भल्या पाहाटे मृत व्यक्ती डी.पी. वर का चढला? या बाबत संब्रमावस्था आहे. अनेक चर्चा ला उधान आहे. प्राप्त् माहीती नुसार आज पहाटे जावेद शेख हा तरूण त्याच्या एका सहका-याला सोबत घेऊन निलजई घुग्गुस रोडवर गेला.त्याने पोल वर चढुन एक स्पॅनचा तार काढला व दुसरा तार काढत्या वेळी त्यातील फेज सुरू असल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसुन तो जागीच ठार झाला. सदर लाईन ही डब्लु.सी.एल ची असुन डमी लाईन आहे.
Related Articles
वरोरा येन्सा येथे स्व: खा.बाळु धानोरकर जयंती निमित्य रक्तदान शिबिर
वरोरा : रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. रक्तदानासारखे पुण्य कार्य जगात कोणतेही नाही. ही भावना लक्ष्यात ठेवून वरोरा तालुक्यातील येन्सा येथे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त 3 जुलै रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात […]
बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाणपुलासाठी ५.२६ कोटी रू. निधी मंजूर
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्यांना यश भाजपा पदाधिका-यांनी नागरिकांसह साजरा केला जल्लोष. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाणपुलासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दिनांक २६ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये ५.२६ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला. यामुळे आनंदीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाबुपेठवासीय नागरिकांसह दिनांक २६ मे रोजी सायंकाळी जल्लोष […]
लिपिक महिलेला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर : राजुरा तहसील कार्यालयातील महिला लिपिक सुनंदा नांदेकर कर्तव्यावर असताना कावलगोदी येथील रवींद्र राठोड तिथे आला आणि काही विचारू लागला. नांदेकर यांनी थोडा वेळ थांबा, मी सांगते, असे म्हणताच राठोड याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तहसीलदार हरीश गाडे यांच्या आदेशानुसार नांदेकर यांनी राजुरा पोलिसांत तक्रार दिली. ही घटना गुरुवारी घडली. तक्रारीवरून राजुरा पोलिसांत […]



