कोरपना (प्र.ती.) कोरपना कडून रूपापेठ येथे जाणाऱ्या दुचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने स्लीप झाली.यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी असल्याची घटना आज बुधवार २७ मे रोजी कोरोना-आदिलाबाद मार्गावरील पार्डी येथील शिवमंदिर जवळ घडली.प्राप्त माहितीनुसार मृतक प्रकाश बापूराव जुमनाके (२२) व गंभीररीत्या जखमी सुरज दौलत सिडाम (२२)राहा. मानोली (खु.)हे दोघेही लग्ना निमित्य मानोली वरून रूपापेठ साठी निघाले होते दरम्यान पारडी जवळ त्यांची दुचाकी एम एच ३४एक्स ३७४१ हि भरधाव वेगात असल्याने वाहनावरून नियंत्रण सुटले. व हा अपघात झाला.
Related Articles
मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर विनयभंग
चंद्रपूर : गुरु शिष्यचा नात्याला काडीमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली आहे. सावली (Savli Taluka) तालुक्यातील सोनापूर (Sonapur) येथील सुभाषचंद्र बोस शाळेचे (Subhash chandra Bose) मुख्याध्यापकावर (Principal) एका विद्यार्थिनीचा (Student) विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्याध्यापक पसार आहे. सावली तालुक्यातील सोनापूर येथे सुभाषचंद्र बोस शाळा आहे. येथे आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग […]
5 हजार रुपयांची लाच घेताना व्यवस्थापकास अटक
चंद्रपूर – वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील DRC -3 खाणीतील व्यवस्थापक दिनेश कराडे हे 5 हजार रुपयांची लाच घेताना CBI ने रंगेहात अटक केली. प्राप्त माहितीनुसार वेकोली कर्मचाऱ्याला पगारी ड्युटी देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली, मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने वेकोली कर्मचाऱ्याने याबाबत नागपूर CBI लाचलुचपत विभागात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यावर CBI च्या चमूने 14 […]
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा….
218 उमेदवारांचा सहभाग तर 76 उमेदवारांची प्राथमिक निवड चंद्रपूर, दि. 10 जून: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 9 जून रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले होते. या […]



