चंद्रपूर (का.प्र.) : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे वाघाचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या मृत व्यक्तीचे नाव दिनकर ठेंगरे आहे. तोहोगांव येथे वास्तव्य करत असलेले दिनकर ठेंगरें हे नेहमीच शेतात जात असे. त्याचे शेत जंगलाला लागलेले आहे. काल दि. 27/06/2020 रोज शनिवारला नेहमी प्रमाणे शेतात गेले. सायंकाळ झाली तरी मात्र ते परत आलेच नाही. मग घरच्यांनी दिनकर चा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र कुठच त्यांचा पत्ता लागत नव्हता. आज सकाळी 8 वा. च्या सुमारास त्याचा मृतदेह जंगलात सापडला असून त्याचा शरीरावर वाघाचे हल्ले दिसून आले. ही घटना गावात कळताच गावकऱ्यांनी जवळच्या पोलिस स्टेशन व वन अधिकाऱ्याला फोन करून कळविले. ही घटना घडताच गावा लगत परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.
Related Articles
राज्य सरकार चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी सकारात्मक – आ. किशोर जोरगेवार
९० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन अपक्ष आमदार म्हणून चंद्रपूरकरांनी ऐतिहासिक मताधिक्याने निवडून दिल. मतदार संघाच्या विकासासाठी सत्ते सोबत राहणे गरजेचे होते. आता याचा विकासकामांच्या रूपाने मोठा फायदा होत आहे. मागील आठ दिवसात विविध विभागाच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकासाठी उपलब्ध केला असून राज्य सरकार चंद्रपूर मतदार संघाच्या […]
भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे – आमदार मुनगंटीवार
चंद्रपूर – महाविकास आघाडी सरकारने एका मागोमाग एक ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण तर अनुसूचित जातीचे पदोन्नतीतील आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. या आधीच्या भाजपा-शिवसेना युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व अनुसूचित जातीचे पदोन्नतीतील आरक्षणही सुरू होते. परंतु तीनही आरक्षणांबद्दल न्यायालयांमध्ये व्यवस्थीत बाजू न मांडल्याने […]



