राजुरा(प्रति) :— काल रात्रौ च्या सुमारास गुप्त माहिती द्वारे नागपूर येथुन १० ते १२ ट्रक गौ वंश आंध्रा येथे नेणार असल्याची बातमी बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली.बातमी ची खात्री करून चंद्रपूर, बल्लारपूर, आणि राजुरा येथील सर्व कार्यकर्त्यांनी रात्रभर पहारा दिला . त्यात रात्रौ ३:००च्या दरम्यान एका गाडीचा संशय आल्याने बजरंग दलाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितल्यावर त्यांने गाडीची स्पीड अधिक वाढवून गाडी अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. आणि भरधाव वेगाने राजुरा कडे निघाला कार्यकर्ते या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरून न जाता त्या ट्रक चा पाठलाग करू लागले.पाठलाग केल्यानंतर ट्रक ला ओव्हरटेक करताना त्याने पुन्हा गाडीला चिरडण्याचा प्रयत्न केला.पण पुढे रेल्वे फाटक बंद असल्या मुळे त्याला थांबावे लागले सिनेस्टाईल पाठलाग करतात बजरंग दलाचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यामागून आलेली दुसरी ट्रक पण तिथे थांबली. पण दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर गाडी तिथेच ठेऊन पळून गेले.मग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर, पोलिस विभागाच्या मदतीने दोन्ही ट्रक ठाण्यात आणण्यात आले.बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता.जीवाला उदार होऊन गौ मातांचे प्राण वाचवण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे, पण वर्षानुवर्ष हजारो जनावरांचे प्राण वाचून सुद्धा आरोपी आणि कसाई यांच्या वर कुठली ही कार्यवाही होताना दिसत नाही, आज सुद्धा गौ हत्या बंदी चा कायदा शासनाने केला.पण अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आजही रोज गाई ची कत्तल सुरू आहे . शासन व प्रशासन कारवाई न करता डोळे मिटून शांत झोप घेत आहेत.शासनाने या गंभीर प्रकरणावर जातीने लक्ष घालून संबंधित गोमाता पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बजरंग दलाचे पदाधिकारी करीत असुन .पुढील प्रकरणाचा तपास राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.या तपासाअंती त्या गोमाता पळविणाऱ्या टोळीवर व संबंधित ट्रक ड्रायव्हर वर कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related Articles
घरात घुसून पट्टेदार वाघाचा वयोवृद्ध महिलेवर हल्ला, महिला ठार.
तालुक्यातील चिकमारा गावात घरात घुसून पट्टेदार वाघाने एका झोपलेल्या वयोवृद्ध महिले वर हल्ला केला त्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना 28एप्रिल गूरूवार ला रात्रौ १ वाजता च्या सुमारास उघडकीस आली आहे.मृतक महिले चे नाव तुळसाबाई परसराम पेंदाम वय 89 रा.चिकमारा तालुका सिंदेवाही असे असून हे महिला घरात झोपले असता रात्री साडेबारा वाजता एका पट्टेदार वाघाने […]
लाभार्थ्यांपर्यंत आनंदाचा शिधा वेळेत पोहचवा
मुख्यमंत्र्यांच्या अधिका-यांना सुचना दूरदृष्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांसोबत संवाद चंद्रपूर : गोरगरीब नागरिकांचे सण गोड व्हावे, यासाठी राज्य शासनाने दिवाळीत आनंदाचा शिधा वाटप करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. हाच आनंदाचा शिधा आता गुडीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलासुध्दा देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अधिका-यांनी योग्य नियोजन करून लाभार्थ्यांपर्यंत आनंदाचा शिधा वेळेत पोहचवावा, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे […]
अचानक कार समोर आला वाघोबा…!
चंद्रपूर : वेकोली वणीक्षेत्रचा भालार टाऊन शिपकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील सुंदर नगर येथील नितीन उकनकर हे भालार मार्गावरून वणीच्या दिशेने जात असताना अचानक एक मोठा वाघ कारसमोरून गेल्याने कारमधील सर्वजण थक्क झाले. हे चित्तथरारक दृश्य त्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. वेकोलिच्या निलजई, उकणी, पिंपळगाव येथील खाणीतून बाहेर पडणारी माती टाकल्यानंतर त्या ढिगाऱ्यांवर अनेक प्रकारची झाडे […]



