राजुरा(प्रति) :— काल रात्रौ च्या सुमारास गुप्त माहिती द्वारे नागपूर येथुन १० ते १२ ट्रक गौ वंश आंध्रा येथे नेणार असल्याची बातमी बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली.बातमी ची खात्री करून चंद्रपूर, बल्लारपूर, आणि राजुरा येथील सर्व कार्यकर्त्यांनी रात्रभर पहारा दिला . त्यात रात्रौ ३:००च्या दरम्यान एका गाडीचा संशय आल्याने बजरंग दलाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितल्यावर त्यांने गाडीची स्पीड अधिक वाढवून गाडी अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. आणि भरधाव वेगाने राजुरा कडे निघाला कार्यकर्ते या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरून न जाता त्या ट्रक चा पाठलाग करू लागले.पाठलाग केल्यानंतर ट्रक ला ओव्हरटेक करताना त्याने पुन्हा गाडीला चिरडण्याचा प्रयत्न केला.पण पुढे रेल्वे फाटक बंद असल्या मुळे त्याला थांबावे लागले सिनेस्टाईल पाठलाग करतात बजरंग दलाचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यामागून आलेली दुसरी ट्रक पण तिथे थांबली. पण दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर गाडी तिथेच ठेऊन पळून गेले.मग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर, पोलिस विभागाच्या मदतीने दोन्ही ट्रक ठाण्यात आणण्यात आले.बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता.जीवाला उदार होऊन गौ मातांचे प्राण वाचवण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे, पण वर्षानुवर्ष हजारो जनावरांचे प्राण वाचून सुद्धा आरोपी आणि कसाई यांच्या वर कुठली ही कार्यवाही होताना दिसत नाही, आज सुद्धा गौ हत्या बंदी चा कायदा शासनाने केला.पण अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आजही रोज गाई ची कत्तल सुरू आहे . शासन व प्रशासन कारवाई न करता डोळे मिटून शांत झोप घेत आहेत.शासनाने या गंभीर प्रकरणावर जातीने लक्ष घालून संबंधित गोमाता पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बजरंग दलाचे पदाधिकारी करीत असुन .पुढील प्रकरणाचा तपास राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.या तपासाअंती त्या गोमाता पळविणाऱ्या टोळीवर व संबंधित ट्रक ड्रायव्हर वर कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related Articles
आजचे कोरोना अपडेट
शनिवारी एकही मृत्यु नाही,17 कोरोनामुक्त, 5 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि.24 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 17 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 5 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 5 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 1, […]
समाजाच्या सत्काराने मला प्रेरणा, ऊर्जा, लढण्याची आणि बदल घडविण्याची शक्ती मिळाली – सुधीर मुनगंटीवार
आर्यवैश्य समाजातर्फे श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार व नोटबुक तुला कार्यक्रम संपन्न राष्ट्र उभारणीकरिता संघर्ष करणारा, सांस्कृतिक, मानवी मुल्य, नैतिकता व राष्ट्रहित जपणारा सात्वीक व प्रामाणिकपणा जपणारा हा माझा समाज आहे. ज्या मॉं वासवी कन्यका मंदीरात मी लहानाचा मोठा झालो, त्याच मंदीरात माझ्या समाजबांधवांकडून माझा झालेला सत्कार हा बॅंकाक, सिंगापूर येथे झालेल्या सत्कारापेक्षाही मोठा व महत्वाचा आहे. या सत्काराने मला […]
ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार
पंचायत राज दिन व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण चंद्रपूर : भारत हा सेवेची पुजा करणारा देश आहे. ज्यांच्या पदनामात सेवक हा शब्द आहे, अशा ग्रामसेवकांवर गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे घड्याळाकडे पाहून काम करू नका तर गावाच्या विकासासाठी ग्रामसेवकांनी तन-मनाने काम करावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त […]



