चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपूर मनपाच्या डम्पिंग यार्ड मध्ये भीषण आग

चंद्रपूर – चंद्रपूर मनपाच्या अष्टभुजा प्रभागात स्थित डम्पिंग यार्ड मध्ये 9 मे ला भीषण आग लागली. सदर यार्ड मध्ये दररोज शहरातील कचरा संकलन करीत इथे जमा करीत घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. आज सकाळच्या सुमारास कचऱ्यातून धूर निघत होता, त्या धुरीचे रूपांतर आगीत झाल्याने ती आग वाऱ्यासारखी परिसरात पसरली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले, चहू बाजूला धुरीने वेढून घेतले.  मनपाच्या अग्निशमन दलाने तात्काळ पोहचत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.