राजुरा(प्रति) :— काल रात्रौ च्या सुमारास गुप्त माहिती द्वारे नागपूर येथुन १० ते १२ ट्रक गौ वंश आंध्रा येथे नेणार असल्याची बातमी बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली.बातमी ची खात्री करून चंद्रपूर, बल्लारपूर, आणि राजुरा येथील सर्व कार्यकर्त्यांनी रात्रभर पहारा दिला . त्यात रात्रौ ३:००च्या दरम्यान एका गाडीचा संशय आल्याने बजरंग दलाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितल्यावर त्यांने गाडीची स्पीड अधिक वाढवून गाडी अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. आणि भरधाव वेगाने राजुरा कडे निघाला कार्यकर्ते या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरून न जाता त्या ट्रक चा पाठलाग करू लागले.पाठलाग केल्यानंतर ट्रक ला ओव्हरटेक करताना त्याने पुन्हा गाडीला चिरडण्याचा प्रयत्न केला.पण पुढे रेल्वे फाटक बंद असल्या मुळे त्याला थांबावे लागले सिनेस्टाईल पाठलाग करतात बजरंग दलाचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यामागून आलेली दुसरी ट्रक पण तिथे थांबली. पण दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर गाडी तिथेच ठेऊन पळून गेले.मग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर, पोलिस विभागाच्या मदतीने दोन्ही ट्रक ठाण्यात आणण्यात आले.बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता.जीवाला उदार होऊन गौ मातांचे प्राण वाचवण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे, पण वर्षानुवर्ष हजारो जनावरांचे प्राण वाचून सुद्धा आरोपी आणि कसाई यांच्या वर कुठली ही कार्यवाही होताना दिसत नाही, आज सुद्धा गौ हत्या बंदी चा कायदा शासनाने केला.पण अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आजही रोज गाई ची कत्तल सुरू आहे . शासन व प्रशासन कारवाई न करता डोळे मिटून शांत झोप घेत आहेत.शासनाने या गंभीर प्रकरणावर जातीने लक्ष घालून संबंधित गोमाता पळविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बजरंग दलाचे पदाधिकारी करीत असुन .पुढील प्रकरणाचा तपास राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.या तपासाअंती त्या गोमाता पळविणाऱ्या टोळीवर व संबंधित ट्रक ड्रायव्हर वर कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related Articles
बनावट देशी दारुच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची धाड
चंद्रपुर :- बनावट देशी दारु निर्माती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड Excise Raid टाकत चंद्रपुर तालुक्यातील चक बोर्डा येथील शेतशिवारात असलेल्या बनावटी नकली दारूचा कारखाना Duplicate country liquor factory उध्वस्त केला यात एकाला अटक करून 1,53,300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रपुर तालुक्यातील मौजा वलनी – चकनिंबाळा रोडवरील चक बोर्डा […]
जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर – मत्स्यव्यवसाय विभागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. रामाळा तलाव परीसर येथे जागतिक मत्स्यपालन दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मत्स्यपालन करणाऱ्या बंधू-भगिनींना ऊर्जा देण्यासाठी हा दिवस […]
*वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांनी घेतली निसर्ग रक्षणाची शपथ*
चंद्रपूर, आज लोहारा-मामला वनक्षेत्रातील अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही एकत्रीत येत इको-प्रो तर्फे आयोजन करण्यात आले. यावेळी तताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर, उप संचालक बफर जी गुरुप्रसाद, डॉ स्वप्निल माधमशेट्टीवार, उप प्राचार्य, सरदार पटेल महाविद्यालय, किशोर जामदार, adv वर्षा जामदार, इको-प्रोचे अध्यक्ष […]



