जिल्ह्यात मुंबई येथून आलेला आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह मिळाला.नव्याने आढळलेला रुग्ण मुलचेरा
तालुक्यातील आहे. मुलचेरा येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलेला होता असे आरोग्य विभागाने कळविले
आहे.
दि.२ जुलै २०२०, सायंकाळी ५.०० *गडचिरोली* : जिल्हयात धानोरा तालुक्यातील एक पुरुष (वय ३५ वर्षे) आणि अहेरी तालुक्यातील दोन (वय २० वर्ष महिला व ३१ वर्षे पुरुष) कोरोना बाधित आढळून आले आहेत. सकाळी दोन व आता तीन असे मिळून ५ कोरोना बाधितांमूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या १३ झाली तर जिल्हयातील एकुण बाधित संख्या ७२ […]
प्रतिनिधी /गडचिरोली :गडचिरोली जिल्हयाच्या तेलंगाणा सिमेवर दोन वाहनातून २ कोटी २० लाखाची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यापैकी १ कोटी २० लाखाची रक्कम नक्षल्यांना देण्यासाठी नेण्यात येत होती या निष्कर्षातून पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे. रोकड जप्त प्रकरणात तेंदूपत्ता कंत्राटदार, मॅनेजर व दोन वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी कंत्राटदाराच्या मॅनेजरला पोलीसांनी […]
गडचिरोली (प्रति ) : जिल्हयात काल रात्री उशिरा 23 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह मिळाले.यातील सर्व व्यक्ती बाहेरील जिल्हा व राज्यातील आहेत, यामध्ये गडचिरोली जिल्हयातील एकही व्यक्ती नाही. यामध्ये 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे आहेत व 1 व्यक्ती भंडारा जिल्हयातील असून नोकरीत रूजू होण्यासाठी भामरागड येथे दाखल झाला होता. यातील सर्व 23 ही व्यक्ती पुरूष आहेत. सर्वांना […]