गडचिरोली (प्रति ) : जिल्हयात काल रात्री उशिरा 23 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह मिळाले.यातील सर्व व्यक्ती बाहेरील जिल्हा व राज्यातील आहेत, यामध्ये गडचिरोली जिल्हयातील एकही व्यक्ती नाही. यामध्ये 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे आहेत व 1 व्यक्ती भंडारा जिल्हयातील असून नोकरीत रूजू होण्यासाठी भामरागड येथे दाखल झाला होता. यातील सर्व 23 ही व्यक्ती पुरूष आहेत. सर्वांना जिल्हयात आल्यानंतर यामध्ये सीआरपीएफला कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे तर भामरागड येथील एका व्यक्तीला भामरागडमध्येच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी सर्वच रूग्ण बाहेरील राज्य व जिल्हयातील असल्यामुळे त्यांच्या नोंदी त्या त्या जिल्हयात तसेच राज्यात करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंतची एकुण बाधित संख्या ७३च राहणार आहे. सदर रुग्णांच्या नोंदी पोर्टल वर सायंकाळपर्यंत राज्य स्तरावरून त्या त्या ठिकाणी अपडेट केल्या जाणार आहेत. २३ पैकी ७ नोंदी राज्य स्तरावरून मंजूर झाल्याने त्या त्या जिल्हयात शिफ्ट केलेल्या आहेत. उर्वरीत नोंदी शिफ्ट करणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
Related Articles
आज जिल्ह्यात एक महिला कोरोनामुक्त, तर दोन नवीन रुग्ण
गडचिरोली(प्रति) : जिल्हयात धानोरा तालुक्यातील एक महिला कोरोनामुक्त झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात ५८ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. रात्री दोन नवीन रुग्ण यामध्ये, गडचिरोली व चामोर्शी येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामूळे सक्रिय कोरोना बाधित संख्या १० झाली तर जिल्हयातील एकुण बाधित संख्या ६९ झाली. धानोरा तालुक्यातील एक महिला काल रात्री कोरोनामुक्त झाल्याने […]
गडचिरोली जिल्हयातआज 94 नवीन बाधित, तर 104 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका),दि.03*: जिल्हयात आज 94 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6110 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5202 वर पोहचली. तसेच सद्या 848 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 60 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण […]
धानोरा येथील ११३ सीआरपीएफ बटालियनमधील आणखी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह
गडचिरोली(प्रति): गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन ११३ मधील ५ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश-२, आन्ध्र प्रदेश-१, कुरखेडा-१, औरंगाबाद-१ येथील जवानांचा समावेश आहे.यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ५३ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ११६ झाली आहे. गडचिरोलीत […]

