चंद्रपुर

नव्या ५ बाधितांमध्ये चंद्रपूरमधील ४ गडचांदूरचा १

चंद्रपूर(का.प्र.) जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी आणखी ५ बाधितांची यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ११८ झाली आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या ५७ आहे.तर सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ६१ झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी परिसरातील एकाच कुटुंबातील एक ४७ वर्षीय महिला व १९ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तेलंगाना राज्यातून हे दोन्ही कुटुंब सदस्य परत आले होते. २६ जून पासून गृह अलगीकरणात होते. काल घेण्यात आलेला त्यांचा स्वॅब आज पॉझिटिव्ह आला आहे.
ऊर्जानगर मधील काल पॉझिटिव्ह आलेल्या बाधित याच्या संपर्कातील 47 वर्षीय महिला देखील आज पॉझिटिव म्हणून पुढे आली आहे. नाशिक येथून हे कुटुंब परत आले होते.चंद्रपूर शहरातीलच हिंदुस्तान लालपेठ कॉलनी येथील ३० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ठाणे शहरातून २४ जूनला ते चंद्रपूर मध्ये आले होते. तेव्हापासून संस्थात्मक अलगीकरणात होते. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह ठरला आहे. तर गडचांदूर येथील शिक्षक कॉलनीतील ४८ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. आसाम राज्यातून २९ जून रोजी परतल्यानंतर सदर व्यक्ती गृह अलगीकरणात होता.त्यांचा काल स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह संख्या ११७ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *