चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील दर्गा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक : आमदार प्रतिभाताई धानोरकर

चंद्रपूर : सध्या देशात जातीजातीत धर्माधर्मात वातावरण बिघडविण्याचे काम काही असामाजिक शक्तींकडून करण्यात येत आहे. परंतु चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील दर्गा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे हजरत मखदूम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबिशाह वली रह अलैह च्या दरगाह येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर, शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रितेश तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, महिला काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे, अनुसूचित जाती विभागाच्या नेत्या अश्विनी खोब्रागडे,माजी नगरसेविका सुनीता अग्रवाल, यांच्या हस्ते चादर चढविण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी ओबीसी शहर अध्यक्ष राहुल चौधरी, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, बलबीर सिंह गुरों, भालचंद्र दानव, पप्पू सिद्दीकी, धरमु तिवारी, नौशाद शेख, काशिफ अली, राजू वासेकर, राजू खजांची यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.