चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

रहमदनगरमहात्मा ज्योतिबा फुले प्रा. शाळा आणि विठोबा खिडकी परिसराला भेट

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात गुरुवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरी भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने त्या नागरिकांना चंद्रपूर महापालिकेच्या विविध शाळेत स्थलांतरित करण्यात आले. शहरातील या पूरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी विनय गौडामहानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीपाल यांनी भेट देऊन पुर पिडीत नागरिकांशी संवाद साधला.

जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील रहमत नगर महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा आणि विठोबा खिडकी या परिसराला भेट देऊन आश्रयास असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणालेपूरग्रस्त नागरिकांना जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. नागरिकांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणीभोजन व्यवस्थानिवारा तसेच स्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीची असावीअशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

पूर परिस्थितीमुळे आश्रयास असलेल्या नागरिकांची संख्या : चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शहरातील 143 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले असून सद्यस्थितीत एकूण 615 नागरिक आश्रयास ठेवण्यात आले आहे. यात म. ज्योतिबा फुले प्रा. शाळेत 35 कुटुंबनागरिक संख्या 149घुटकाळा येथील किदवाई शाळेत 20 कुटुंबनागरिक संख्या 82लालपेठ येथील माना प्रा. शाळेत 11 कुटूंबनागरीक संख्या 52नागाचार्य मंदिरमहाकाली वार्ड येथे 10 कुटूंबनागरीक संख्या 40महाकाली प्रा. कन्या शाळेत 48 कुटूंबनागरीक संख्या 212,  आणि शहीद भगत सिंह शाळेत 19 कुटूंब,  नागरीक संख्या 80असे एकूण 143 कुटूंबातील 615 नागरिकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *