दि.२ जुलै २०२०, सायंकाळी ५.००
*गडचिरोली* : जिल्हयात धानोरा तालुक्यातील एक पुरुष (वय ३५ वर्षे) आणि अहेरी तालुक्यातील दोन (वय २० वर्ष महिला व ३१ वर्षे पुरुष) कोरोना बाधित आढळून आले आहेत. सकाळी दोन व आता तीन असे मिळून ५ कोरोना बाधितांमूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या १३ झाली तर जिल्हयातील एकुण बाधित संख्या ७२ झाली.
धानोरा तालुक्यातील रुग्ण कर्नाटक येथून आल्यावर संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. अहेरी येथील महिला(वय ३५ वर्ष) हैद्राबाद येथून जिल्हयात दाखल झाली होती. अहेरी येथील दुसरा रुग्ण वय ३१ वर्षीय पुरुष दिल्ली येथून जिल्हयात आला होता. दोघेही संस्थात्मक विलगीकरणात होते.
यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित आकडेवारी ७२ झाली. आतापर्यंत एकूण ५८ कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्या १३ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातून आलेला एक CRPF चा जवान कोरोना बाधित आढळून आलेला आहे. मात्र त्याची नोंद गडचिरोली जिल्हयातील रुग्णांत केली जाणार नाही. सदर रुग्णाची नोंद औरंगाबाद येथे केलेली आहे. फक्त जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
त्यामूळे जिल्हयात आज जरी ६ रुग्ण आढळून आले असले तरी जिल्ह्यातील आजची नोंद ५ होणार आहे( एकुण ७२).




