ब्रह्मपुरी (प्रतिनिधी)तालुका मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असलेल्या नान्होरी जिल्हा परिषदेच्या शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवतीने गावातीलच एका इसमाने विनयभंग केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दि 25 मे रोजी दाखल केली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून क्वारंटाईन व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. क्वारंटाईन व्यक्ती कितपत सुरक्षित आहेत आणि प्रशासन त्यांची कितपत चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे हे वरील तक्रारीवरून समजून येते.याधारे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात आरोपी काकाजी प्रधान यांच्याविरोधात कलम 294,323,354,506 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत.
Related Articles
शेतकऱ्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी माजी मंत्र्यांची वनविभागावर धडक
मुल – दिनांक 25 /11 /2022 महाराष्ट्रातील ताडोबा बफर झोन चंद्रपूर येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे वनविभागाचे मुख्य सचिव वेणू गोपाल रेडडी साहेब व शोभाताई फडणवीस, माजी मंत्री यांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यामध्ये शोभाताई यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या, आणि त्यांना येणाऱ्या नेहमीच्या अडचणीला वाचा फोडून शेतकऱ्यांच्या समस्या प्रामुख्याने मांडल्या वन्यप्राणी वाघ व मनुष्य संघर्ष […]
अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घाला – आ. किशोर जोरगेवार
पोलिस अधिक्षकांची भेट घेत केल्या सुचना जिल्ह्यातील दारुबंदी उठल्या नंतर दारुबंदी व्यवसायात गुंतलेले गुणगारी प्रवृत्तीच्या गुंडांनी इतर अवैध व्यवसाय सुरु केले आहे. यात ऑनलाईन क्रिकेट जुगार चालविण्या-र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे युवा वर्ग यात गुंतत असुन अनेकांनी आर्थिक नुकसाणीमुळे आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देत जिल्हात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रतिबंध […]
खुटवंडा येथील महिला धडकल्या भद्रावती पोलिस ठाण्यावर
गावातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्याची केली मागणी भद्रावती- भद्रावती तालुक्यातील खुटवंडा या गावात व परिसरात अवैध दारुविक्री जोरात सुरु असुन या अवैध दारू विक्री मुळे त्रस्त झालेल्या खुटवंडा येथील महिलांनी भद्रावती पोलीस ठाण्यावर धडक देत सदर अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन ठाणेदार बिपीन इंगळे यांना सोमवारी सादर […]



