ब्रह्मपुरी (प्रतिनिधी)तालुका मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असलेल्या नान्होरी जिल्हा परिषदेच्या शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवतीने गावातीलच एका इसमाने विनयभंग केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दि 25 मे रोजी दाखल केली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून क्वारंटाईन व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. क्वारंटाईन व्यक्ती कितपत सुरक्षित आहेत आणि प्रशासन त्यांची कितपत चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे हे वरील तक्रारीवरून समजून येते.याधारे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात आरोपी काकाजी प्रधान यांच्याविरोधात कलम 294,323,354,506 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत.
Related Articles
चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी १४ कोटी ०१ लक्ष ४७ हजार रू. निधी मंजूर
चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी जुलै २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पात १४ कोटी ०१ लक्ष ४७ हजार रू. निधीची तरतूद करण्यात आली आहे. वने व सांस्कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. सन २०१४ […]
आज नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते महाराष्ट्र राज्यगीताचे लोकार्पण
*माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती* *छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य* येथील भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे रविवार 19 फेब्रुवारीला शिव जयंती उत्सवाचे आयोजन सकाळी 09 च्या सुमारास करण्यात आले असून यावेळी सांस्कृतिक कार्य,वने व मत्स्यपालन व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते ‘जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा…’या राज्यगीताचे लोकार्पण पटेल हायस्कुल […]
आजचे कोरोना अपडेट
चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 9 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 9 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 4, बल्लारपूर 0, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, […]



