ब्रह्मपुरी (प्रतिनिधी)तालुका मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असलेल्या नान्होरी जिल्हा परिषदेच्या शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये असलेल्या युवतीने गावातीलच एका इसमाने विनयभंग केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दि 25 मे रोजी दाखल केली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून क्वारंटाईन व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. क्वारंटाईन व्यक्ती कितपत सुरक्षित आहेत आणि प्रशासन त्यांची कितपत चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे हे वरील तक्रारीवरून समजून येते.याधारे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात आरोपी काकाजी प्रधान यांच्याविरोधात कलम 294,323,354,506 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत.
Related Articles
कोलगाव कोळसा खाण परिसरात दिवसाढवळ्या नागरिकांना वाघाचे दर्शन
चंद्रपुर :- कोलगाव खुल्या कोळसा खाण परिसरात दिवसाढवळ्या कामगार व नागरिकांना वाघाचे दर्शन झाल्यानं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोलगाव कोळसा खाण परिसरात वेकोलीचे ओव्हर बर्डन असून ठिकठिकाणी झाडेझुडपे वाढले आहेत. त्यामुळं या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर सुद्धा नेहमी बघायला मिळतो. अशातच कोलगाव मार्गावर काही वेकोली कामगारांना दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन झाले. या वाघाचे चित्रीकरण येथील […]
महर्षी वाल्मिक ऋषींच्या रचित “रामायणामुळे प्रभू राम चरित्राची जगाला ओळख – माजी मंत्री वडेट्टीवार
पेटगाव येथे महर्षी वाल्मिक ऋषी मूर्ती प्रतिष्ठापना उत्सव समाजातील साधू संतांचे विचार हे समाज घडविण्यासाठी नेहमीच प्रेरक ठरले आहे. त्यांनी दाखवलेली दिशा ही समाजाला विकासाची वाट दाखविणारी असून यातून समाजाचे कल्याणच झाले आहे. अशा थोर संत महर्षी वाल्मिकी ऋषींनी जे महान ग्रंथ रामायण रचिले त्या ग्रंथातूनच जगाला प्रभू रामचंद्राच्या चरित्राची संपूर्ण ओळख झाली. असे प्रतिपादन […]
तहानलेल्या पाणी देणे महान कार्य-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी
रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठतर्फे पाणपोईचे उदघाटन चंद्रपूर : भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हे पुण्याचे कार्य आहे. प्रत्येक धर्माने हीच शिकवण दिली आहे. समाजातील गरजूंना लाभ व्हावा, या उद्देशातून सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठच्या वतीने सुरू करण्यात आलेली पाणपोई हा सामाजिक उपक्रमाचाचा भाग […]



