चंद्रपूर (का . प्र ) चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून आज दि. २६ मे रोजी राजुरा येथील भारत चौकात राहणारा शफिक शेख इमाम या २७ वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. स्थानिक भारत चौक येथील रहिवाशी शफिक शेख इमाम वय २७ या युवकाचा उष्माघाताने दूर्देवी मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसापासून राजुरा भागात भीषण उन्हाचा तडाखा नागरिकांना बसत आहे. येथील तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्याची माहिती आहे. शफिक हा गरीब कुटुंबातील युवक येथील एका दुकानात काम करतो. हा युवक उन्हात फिरल्यानंतर त्याची प्रकृति बिघडली . त्याला दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान प्रचंड वाढले असून ४६ ते ४७ डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काळ पासून नवतपा सुरु झाला आहे. तरी नागरिकांनी उन्हात कमीत-कमी निघावे. व उष्णेपासून स्वतः बचाव करावा
Related Articles
पिस्तूलसह सराईत गुन्हेगाराला अटक
स्थानिक गुन्हे शाखेची लक्षणीय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी अग्नीशस्त्रासह एका सराईत गुन्हेगाराला दुर्गापूर परिसरात ताब्यात घेतले असून ह्या गुन्हेगाराकडून होऊ घातलेल्या गुन्ह्यास अटकाव करण्यात यश आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त सूचनेनुसार दुर्गापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रमोद रामलाल सुर्यवंशी वय 36 वर्षे हा सराईत गुन्हेगार […]
एकनाथ शिंदे बंड करून 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीत दाखल….
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या धर्तीवर काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड करून 40 आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. आज हे सर्व आमदार विशेष विमानाने गुवाहाटीला दाखल झाले आहेत. गुवाहाटी विमानतळाबाहेरून खास तीन बसेसने आमदारांना रॅडिसन हॉटेलमध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत प्रहार संघटनेचे बच्चू कडूही असून या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या समर्थन पत्रावर साह्य […]
देशी कट्ट्यासह घातक हत्यारे जप्त.
जिल्ह्यात सर्वात शांत व गंभीर गुन्ह्याचे प्रमाण कमी असलेला तालुका म्हणुन राजुरा तालुक्याचे नावलौकिक आहे. राजुरा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. मात्र मागील काही काळापासून राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून अवैध कोळसा तस्करी, गोवंश तस्करी, रेती तस्करी, जुगार, अंमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसुन येत असतानाच राजुरा पोलिसांनी […]



