चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

खुटवंडा येथील महिला धडकल्या भद्रावती पोलिस ठाण्यावर

गावातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्याची केली मागणी

भद्रावती-   भद्रावती तालुक्यातील खुटवंडा या गावात व परिसरात अवैध दारुविक्री जोरात सुरु असुन या अवैध दारू विक्री मुळे त्रस्त झालेल्या खुटवंडा येथील महिलांनी भद्रावती पोलीस ठाण्यावर धडक देत सदर अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन ठाणेदार बिपीन इंगळे यांना सोमवारी सादर केले.
      तालुक्यातील खुटवंडा गावात व परिसरात अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात होत असुन या अवैध दारुविक्रीमुळे गावपरिसरातील महिला तथा लहान मुले त्रस्त झालेली आहेत.या अवैध दारुविक्रीचा विषय ग्रामसभेत सुद्धा घेण्यात आलेला आहे.या अवैध दारुविक्रीमुळे गाव तथा परिसरातील सामाजिक स्वाथ्य बिघडत चालले आहेत.या अवैध दारुविक्रीमुळे परिसरातील लहान मुले व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अवैध दारुविक्रीमुळे महिला तथा शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.या अवैध दारुविक्रीमुळे गावपरिसरातील रोज झगडे व कलह निर्माण होत आहे.या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या परिसरात सुरु असलेली अवैध दारुविक्री बंद करुन येथील महिला व शाळेकरी मुलांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती तुळशीराम श्रीरामे यांच्या नेतृत्वात निवेदन देतांना अश्विनी मडावी,मिनाक्षी सेडमाके,साधना कन्नमवार, लक्ष्मी जुमनाके यांचे सोबत अन्य महिला उपस्थित होत्या.यावेळी सरपंच बंडू पाटील नन्नावरे, माजी सरपंच प्रभाकर सोनवाणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंबादास बावणे, विजय वानखेडे उपस्थित होते. नंतर तहसीलदार, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *