

चंद्रपूर – भद्रावती तालुक्यात बरांज (मोकासा) कोळसा खाण पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्सर्वेक्षण करून ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी लोकसभेत नियम ३७७ अन्वये खासदार बाळू धानोरकर यांनी केली.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील भद्रावती तालुक्यात 2003 च्या कोळसा खाण वाटपात बरांज कोळसा खाण कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला कोळसा मंत्रालयाने दिली होती. ही खाण प्रत्यक्षात 2008 मध्ये सुरू झाली. कोळसा घोटाळ्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 मार्च 2015 रोजी खाण बंद करण्यात आली होती. त्यामुळे बरांज खाण प्रकल्पामुळे कामगार व ग्रामस्थांच्या कुटुंबांवर उपासमारीची समस्या प्रभावीपणे निर्माण झाली. 1 डिसेंबर 2020 पासून सदर खाण पुन्हा सुरू झाली. मात्र या प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या समस्या प्रभावीपणे सुटल्या नाहीत. सदर कोळसा खाण वाटप केल्यामुळे चकबरंज, पिपरबोडी, बरांज (मोकासा), बरांज (तांडा) या प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्सर्वेक्षण करून ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.



