बल्लारपूर:- दुचाकी लोखंडी खांबाला जाऊन आदळली व त्यात दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाला. राकेश देवा उमरे (२७ वर्षे) रा.सात खोली,शिवाजी वॉर्ड, बल्लारपूर असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात शनिवारचे रात्री दहा वाजता दरम्यान घडली.
राकेश वस्ती भागातून आपल्या घराकडे जात असताना त्याची मोटारसायकल रेल्वे गोल पुलाजवळील लोखंडी खांबावर आदळली. जखमी अवस्थेत त्याला चंद्रपूर सामान्य रुग्णालयात भरती केले होते. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.



