बल्लारपूर:- दुचाकी लोखंडी खांबाला जाऊन आदळली व त्यात दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाला. राकेश देवा उमरे (२७ वर्षे) रा.सात खोली,शिवाजी वॉर्ड, बल्लारपूर असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात शनिवारचे रात्री दहा वाजता दरम्यान घडली.
राकेश वस्ती भागातून आपल्या घराकडे जात असताना त्याची मोटारसायकल रेल्वे गोल पुलाजवळील लोखंडी खांबावर आदळली. जखमी अवस्थेत त्याला चंद्रपूर सामान्य रुग्णालयात भरती केले होते. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.
Related Articles
जिल्हाधिका-यांनी केली बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी
चंद्रपूर : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुके आणि चंद्रपूर शहराला पूराचा तड़ाखा बसला. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दोन दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील गावांचा दौरा केला होता. तर आज (दि. 23 ) त्यांनी बल्लारपुर तालुक्यातील बामणी, विसापुर या पूरग्रस्त गावांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना करताना जिल्हाधिकारी श्री. […]
नशीब व अंधश्रद्धे च्या नादी न लागता आपल्या कर्तुत्वाच्या बळावर यश संपादन करून प्रशासकीय अधिकारी व्हावे- माजी मंत्री वडेट्टीवार
ब्रह्मपुरी नगरीला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाते. या क्षेत्राचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या क्षेत्रात सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य व समाजकार्याचा वारसा पुढे नेत क्षेत्रातील जनते करिता जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता सर्वतोपरी प्रयत्न चालविले. विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी केवळ नशीब व अंधश्रद्धे च्या नादी न लागता आपल्या कर्तुत्वाच्या बळावर यश संपादन करून […]
शासन आपल्या दारी : मनरेगाचा आधार ; मजुरांना नियमित रोजगार
चंद्रपुर :- दि.२७: मनरेगा कामांची नियोजनपूर्वक आखणी करून प्रभावी अंमलबजावणी केल्याने यावर्षी चंद्रपुर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मजुरांनी हजेरी लावली आहे. मजुर उपस्थितीमध्ये चंद्रपुर जिल्हा आज राज्यात द्वितीय स्थानांवर तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातंर्गत सर्व तालुक्यामधील नरेगाच्या विविध कामावर […]



