चंद्रपूर जिल्हातील ४३ बाधित
कोरोनातून झाले बरे
आतापर्यतची बाधित संख्या ५६
जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित १३
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील कासरगट येथील २६ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली येथून २० जून रोजी परत आलेल्या या युवकाने नागपूर एअरपोर्टवरून थेट शकुंतला लॉन येथे येत तपासणी केली होती. नवी दिल्ली येथे असताना त्याला तापाची लक्षणे होती. त्यामुळे शकुंतला लॉन येथून तपासणी केल्यानंतर चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. २१ तारखेला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा युवक सध्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.




