चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 10 कोरोना पॉझिटिव्ह

*गत 24 तासात 15 कोरोनामुक्त

*आतापर्यंत 22,661 जणांची कोरोनावर मात

*ॲक्टीव पॉझिटिव्ह 93

चंद्रपूर, दि. 8 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 10 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 23 हजार 146 झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 661 झाली आहे. सध्या 93 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख तीन हजार 587 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 78 हजार 503 नमुने निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत 392 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 354, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 10 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील सहा, चंद्रपूर तालुक्यात एक, कोरपना एक, जिवती एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *