चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

बनावट एटीएमद्वारे फसवणुक करणाऱ्या ०५ आरोपीतांना ९ प्रकरणाध्ये ०५ वर्ष कारावासाची शिक्षा सायबर पोलीस ठाणे यांना मोठे यश

पोलीस स्टेशन रामनगर, वरोरा आणि राजुरा हद्दीत फिर्यादीचे बनावट एटीएम तयार करून एटीएमद्वारे फसवणुक करणाऱ्या टोळीला चंद्रपुर जिल्हयात एकुण ०९ गुन्हयात ०५ वर्षांची शिक्षा दि. २३/०८/२०२१ रोजी मा. श्री. शिवनाथ एम. काळे, मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट चंद्रपुर यांनी सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

पोलीस स्टेशन रामनगर, वरोरा आणि राजुरा अंतर्गत माहे ऑक्टोंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत कालावधीत गुन्हयातील फिर्यादी ए.टी.एम. धारक यांचे बँक खात्यातील पैसे दिल्ली व गुडगांव येथुन परस्पर विड्राल करुन नागरीकांची फसवणुक होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन वरोरा, रामनगर, राजुरा या ठिकाणी एकुण ०९ गुन्हयाची नोंद करण्यात आली. सदरचा गुन्हा हा तांत्रीक आणि अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने सदरचा गुन्हा हा सायबर पोलीस ठाणे यांचेकडे सोपाविण्यात आला होता.

सायबर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयांचे तपासास तात्काळ सुरवात करुन तकारदारांच्या बँक खात्यांचे स्टेटमेंट पासुन वेगवेगळया मुद्दयांवर विश्लेषण केले. विश्लेषण व केलेला तपास यावरून प्रथम तपास पथकाने वरोरा येथे राहणारा जो एटीएममध्ये जावुन १६ अकी नं. व पिन नं. चोरी करीत होता त्या आरोपीस दि. २५/११/२०१७ रोजी दुपारी अंत्यत शिताफीने पोस्टे वरोरा अप. क. १३३४/२०१७ कलम ४२० भादंवि मध्ये अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेतला. जलदरीतीने तपास करीत सदर गुन्हयामधील मुख्य आरोपी तसेच गुडगांव येथील ए.टी.एम. मधुन पैसे विड्राल करणारा आरोपी यांचे नांवे निष्पन्न करुन आरोपी हा चंदीगढ येथे पसार झाल्याची माहीती समोर येताच तपास पथक तात्काळ दि. ०१/१२/२०१७ रोजी चंदीगढ येथे पोहचुन आरोपीस त्या हॉटेल मधुन ताब्यात घेवुन तांत्रीक विश्लेषण यावरून गुडगांव येथील ए.टी.एम. मधुन पैसे विड्राल करणाऱ्या दुसऱ्या आरोपीस दि. ०२/१२/२०१७ रोजी दिल्लीचे रेल्वे स्टेशन जवळ सापळा रचुन ताब्यात घेतले.

आरोपींनी अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, नांदेड, औरंगाबाद, वाशिम ईत्यादी वेगवेगळया ठिकाणी पाठविले. या ठिकाणी गेलेल्या आरोपींतानी ए.टी.एम.  मध्ये जावुन येथील ए.टी.एम.  धारक पैसे काढत असताना येथील ए.टी.एम.  वरील १६ अंकी नं. व पिन नं. यांची Shoulder Reading द्वारे चोरी करुन मुख्य आरोपीस फोनद्वारे देत होते. त्यावरून मुख्य आरोपी हा १६ अंकी नं. चा उपयोग करून गुडगांव व दिल्ली येथील ए.टी.एम. मधुन लाखो रुपये काढुन नागरीकांची फसवणुक करीत होता. चंदीगढ व दिल्ली येथुन अटक केलेल्या आरोपींकडुन काही बनावट ए.टी.एम. कार्ड, मोबाईल हॅन्डसेट, तसेच काही ए.टी.एम. वरील १६ अंकी नं. व पिन नं. नोंद असलेले नोटबुक असा मुददेमाल जप्त केला असुन त्याबाबत तपास सुरू होता. चंद्रपुर पोलीसांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणुन केलेल्या या कार्यवाहीमुळे गुन्हा करण्याच्या या पद्धतीमुळे भविष्यात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणुक यावर नक्कीच प्रतिबंध लागला. सदरच्या गुन्हयात आरोपी नामे विशाल तुळशिराम उमरे वय ३५ रा. पंचशिल चौक आझाद वार्ड वरोरा, हरिदास हरविलास विश्वास वय २९ रा. एम यु १६, शिखापल्ली जि. मलकानगिरी, किसन लालचंद यादव वय २५ रा. गाजीपुर डेअरी फार्म, गल्ली नं ७ दिल्ली, जितेंद्रकुमार अनिलकुमार सिंग वय २४ रा. नोनी पोस्टे निमसर मेन जिला गया बिहार, पारितोष तारापद पोद्दार वय ३२ रा. एम व्ही १६ मलकानगिरी ओडीसा जि. मलकानगिरी यांना अटक करून तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक किसन शेळके व पोलीस उपनिरिक्षक, विकास मुंढे यांनी आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. तेव्हापासुन आरोपी हे जेलमध्येच होते.

न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दि. २३/०८/२०२१ रोजी वरील पाचही आरोपीतांना कलम ४२०,४६५,४६८,४७१,१२० ब,३४ भादंवि सहकलम ६६ क माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये सर्व आरोपीतांना ०५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मा. श्री. शिवनाथ एम. काळे, मुख्यन्यायदंडाधिकारी कोर्ट चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक श्री. किसन शेळके यांनी केला असुन सरकारतर्फे सरकार तर्फे अॅड. श्री. ए. आर. मसराम, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोअं. श्री. भास्कर चिचवलकर सायबर पोलीस ठाणे चंद्रपुर, पोहवा. श्री. श्रीराम मडावी, पोलीस स्टेशन रामनगर यांनी काम पाहिले. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता आणि आरोपीतांना शिक्षा होण्यास सायबर पोलीस ठाणे येथील तत्कालीन पोउपनि. विकास मुंढे, व नापोशि मुजावर अली, संतोष पानघाटे, प्रशांत लारोकर, पोअं. इमरान शेख, छगन जांभुळे, भास्कर चिचवलकर, उमेश रोडे, राहुल पोंदे, वैभव पत्तीवार यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे.

कलम ४२० भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान कायदा यासारखे क्लिष्ट गुन्हयामध्ये आरोपींना शिक्षा होणे हे एक आव्हानात्मक काम असतांना चंद्रपुर जिल्हा सायबर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि अंमलदार यांच्या कामगीरीबदद्ल मा. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि शेखर देशमुख पोलीस उपअधीक्षक(गृह) यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.