चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

कोरपना येथे विदर्भवाद्यांनी महामार्ग रोखला ; वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा

विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका कोरपना च्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी रास्ता रोको आंदोलन कोरपना येथील बस स्थानक परिसरात करण्यात आले. या आंदोलनामुळे तब्बल एक तास चंद्रपूर आदीलाबाद राष्ट्रीय महामार्ग व वणी राज्य महामार्ग रोखला गेला होता. यामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागला गेल्या होत्या.आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले यांनी केले. या आंदोलनात स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित देण्यात यावे, कोरोना काळातील वीजबिल माफ करण्यात यावे, शेती पंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, जमिनीचे पट्टे देण्यात यावे, पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द करण्यात यावी, साप चावून मरणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना इतर वन्य प्राण्याप्रमाणे तात्काळ मदत देण्यात यावीआदी  मागन्या  करण्यात आल्या:

Leave a Reply

Your email address will not be published.