
बाबू पेठ येथील गौरी तलाव येथील घरून दुचाकी चोरून नेणाऱ्या 19 वर्षीय आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे.
मुल येथील रहिवासी असलेले डेव्हिड निमगडे हे त्यांचे जावई गौरी तलाव येथील रहिवासी विजय भडके यांना भेटण्यासाठी मोटरसायकलने आले होते. त्यानंतर त्यांच्या घरी मोटरसायकल ठेवून ते नागपूरला गेले. दहा ऑक्टोबर रोजी दुपारी गौरी तलाव बाबू भेटीचे परत आले असता त्यांची गाडी दिसली नाही. ती गाडी कोणीतरी चोरून नेल्याचे घरच्यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास नायक पोलीस शिपाई चेतन गजलवार यांनी केला. या पोलीस तपासामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी गुप्त खबऱ्यांच्या माहितीतून माहिती घेतली असता एक मुलगा गाडी विक्री करण्यासाठी आल्याचे कळले. पोलिसांनी सापळा रचून करण इंदुल निषाद राहणार रामनगर सास्ती वसाहत वर्धा नदी पुलाजवळ यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून
हिरो फॅशन दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, सहायक पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख, पोलीस हवालदार महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंता चुनारकर, चेतन गजलवार, सचिन बोरकर, इमरान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रुपेश रणदिवे यांनी केली.




