चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड

पोटरा , तिचं शहर होणं , पांडीचेरी , राख आणि पल्याड
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

चंद्रपूर – गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट Goa Film २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा , तिचं शहर होणं , पांडीचेरी , राख आणि चंद्रपूरची निर्मिती असलेल्या पल्याड या चित्रपटांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. सदर ५ मराठी चित्रपटांच्या निवडीसाठी ५ तज्ज्ञांची Goa Film समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत निर्माती अभिनेत्री किशोरी शहाणे वीज , एफटीआयआय चे धीरज मेश्राम , युनेस्को चे ज्युरी मनोज कदम , चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर , चित्रपट लेखक व दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता.या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे २५ चित्रपटांचे परीक्षण करत या ५ चित्रपटांची निवड केली आहे. हे चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रत्येक चित्रपटाचे दोन प्रतिनिधी या प्रमाणे ५ चित्रपटाचे १० प्रतिनिधी पाठविण्यात येणार आहे. या चित्रपटांच्या निर्मात्यांचे व संपूर्ण चमुचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *