चंद्रपुर

४०० युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करावे- आ.सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. १४ एप्रिल पर्यंत देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब गरजू चिंतीत झाले आहे. या संकट समयी ४०० युनिट पर्यंत विजेचा वापर करणाèया गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर […]

चंद्रपुर

गडचिरोलीचे जिल्हा कारागृह सुरू करण्याची खा.धानोरकरांची मागणी

चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहे. त्यामुळे कैद्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पाश्र्वभूमीवर गडचिरोली येथील तयार असलेले जिल्हा कारागृह सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. चंद्रपूर येथे जिल्हा कारागृह आहे. या कारागृहातील कैद्यांची क्षमता ३३० इतकी आहे. मात्र, या ठिकाणी दुप्पट […]

चंद्रपुर

रस्त्यावरची गर्दी कमी करा; आजपासून पोलिस सक्त कारवाई करणार

चंद्रपूर (का.प्र.) पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असून घराबाहेर न पडण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था प्रशासन करत आहे. जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था देखील या कामी पुढे आल्या असून वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरीकांचा यासाठी पाठबळ मिळत आहे. पोलीस प्रशासनाने रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या ४६ जणांवर गुन्हे दाखल केले असून उद्यापासून आणखी कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात […]

चंद्रपुर

पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील १० हजार मजुरांना मोठा दिलासा

चंद्रपूर (का.प्र.) जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे.कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रवासावरही अटी लावण्यात आल्या आहेत.यामुळे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील जे मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत अशा १० हजार मजुरांना आहेत त्या ठिकाणी राहण्याची आणि भोजनासह खाण्यापिण्याची व्यवस्था तेलंगना सरकार करून देणार असल्याने त्यांच्या सह त्यांच्या […]

चंद्रपुर

आरोग्य सुविधांवर एक कोटीच्या खर्चाची परवानगी द्या -आ.सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून विशेष बाब म्हणून एक कोटी रूपयाचा निधी खर्च करण्याची परवागनी देण्यात यावी, याबाबत जिल्हाधिकारी यांना सर्वाधिकार प्रदान करावे, अशी मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री […]

चंद्रपुर

आम.जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला परिस्थितीचा आढावा

चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विरोधातील लढ्यात प्रशासन युध्द स्तरावर काम करत आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ. किशोर जोरगेवार यांनी जनतेला घरीच राहण्याचे आवाहन केले असून त्यांच्या वतीने गरजूंना शक्य ती मदत पोहचविल्या जात आहे. दरम्यान आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेऊन बंद नंतरची परिस्थिती जाणून घेतली तसेच यावेळी त्यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतूकही केले. […]

चंद्रपुर

सर्वांनी घरीच थांबावे हाच कोरोनावर एकमात्र उपाय

चंद्रपूर (का.प्र.) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांनी घरीच रहावे यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि, १४ एप्रिल व त्यानंतरही गरज पडल्यास दीर्घ काळाच्या खानपान व्यवस्थेसाठी प्रशासन प्रयत्नरत असल्याचे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली अन्नधान्य, इंधनाबाबत साठा व वितरण विषयक बैठक घेण्यातआली. […]

चंद्रपुर

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनधारकांनाच मिळणार पेट्रोल व डिझेल

चंद्रपूर (का.प्र.) जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. परंतु, या सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनधारकांना पेटड्ढोल व डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी पेट्रोल पंप धारकांना दिले आहेत. या वाहनधारकांना मिळणार पेट्रोल व डिझेल किराणामाल, भाजीपाला, फळे, दुध-अंडी, औषधे पुरविण्याकरीता वाहतुकीच्या रिकाम्या, भरलेल्या गाड्या, दुकानदार, दुकानात काम […]

चंद्रपुर

११ तुर्कस्तानी मौलवी २२ दिवसापासून चंद्रपुरातील मशिदीत लपून

चंद्रपूर (का.प्र.)तुकुम परिसरातील मशिदीत असलेले एकूण १४ तुकीस्थानियांना पोलिसांनी काल अटक केली होती. मात्र त्यांनी आपल्या आगमनाची माहिती पोलीस प्रशासनाला दिली असल्याची माहिती समोर आल्याने आज सर्व १४ तुकीस्थानियांना सोडण्यात आले. तुर्कस्तानातून आलेले १४ मौलवी चंद्रपुरातील एका मशिदीमध्ये गेल्या २२ दिवसांपासून लपून बसल्याची धक्कादायक माहिती बुधवारी उघडकीस आली आहे. ही बाब लक्षात येताच रामनगर पोलिसांनी […]

चंद्रपुर

मंदाकिनी गोविंदराव नालमवार यांचे दुःखद निधन

चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर येथील प्रतिष्ठीत नागरिक स्व. श्री. गोविंदराव नालमवार यांच्या पत्नी मंदाकिनी गोविंदराव नालमवार यांचे वृध्दापकाळाने आज दि. २६ मार्च २०२० रोजी दुपारी १ वा. दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांंये वय ८५ वर्ष होते. त्या न्यु भारत तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका होत्या. त्या अंतर्गत त्या स्लम एरियात बालवाडी व पाळणाघर चालवित होत्या. व आपल्या परिने […]