चंद्रपुर

आम.जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला परिस्थितीचा आढावा

चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विरोधातील लढ्यात प्रशासन युध्द स्तरावर काम करत आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ. किशोर जोरगेवार यांनी जनतेला घरीच राहण्याचे आवाहन केले असून त्यांच्या वतीने गरजूंना शक्य ती मदत पोहचविल्या जात आहे. दरम्यान आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेऊन बंद नंतरची परिस्थिती जाणून घेतली तसेच यावेळी त्यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतूकही केले. कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात चंद्रपूरकर स्वयंस्फूर्ती ने सहभागी झाला आहे. चंद्रपूर बंदला चंद्रपूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. नागरिकांंच्या सहकार्या शिवाय या महामारीशी लढणे कठीण असून नागरिकांनी समोरही प्रशासनाला असेच सहकार्य करावे असे आवाहन आ. किशोर जोरगेवार यांनी जनतेला केले आहे.

दरम्याण आज आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेतली असून बंद नंतरच्या परिस्थिती बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी आ. जोरगेवार यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतूकही केले. विधानसभेत प्रशासनाला शक्य सर्व मदत करण्याचेही यावेळी आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे. सध्या चंद्रपूरात कोरोनाचा एकही पॉजेटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. त्यामूळे चंद्रपूकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही यावेळी आ. जोरगेवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *