
ब्रह्मपुरी – जगात तापमानात भारी चंद्रपूर व ब्रह्मपुरी मध्ये उन्हाचा तडाखा पुन्हा वाढायला लागला आहे. कुलर व एसी ने सुद्धा या तापमानसमोर हार मानलेली दिसते. अश्यातच ब्रह्मपुरी शहरातील देलनवाडी येथील उराडे पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या बँक ऑफ बडोदा च्या ATM ला अचानकपणे आग लागली. हळूहळू आगीने विक्राळ रूप धारण केले, ATM च्या बाजूला बिअर शॉपी असल्याने आग पसरणार की काय अशी शक्यता होती मात्र पोलीस व अग्निशमन विभागाच्या सतर्कतेने आगीवर वेळेच्या आधी नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले. सदर आग ही Short Circuit मुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, आगीमुळे किती नुकसान झाले याची परिपूर्ण माहिती बँकेतील व ATM ची देखभाल करणारे एक्स्पर्ट आल्यावर सांगता येईल अशी माहिती ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन यादव यांनी दिली आहे




