
चंद्रपूर (का.प्र.)तुकुम परिसरातील मशिदीत असलेले एकूण १४ तुकीस्थानियांना पोलिसांनी काल अटक केली होती. मात्र त्यांनी आपल्या आगमनाची माहिती पोलीस प्रशासनाला दिली असल्याची माहिती समोर आल्याने आज सर्व १४ तुकीस्थानियांना सोडण्यात आले. तुर्कस्तानातून आलेले १४ मौलवी चंद्रपुरातील एका मशिदीमध्ये गेल्या २२ दिवसांपासून लपून बसल्याची धक्कादायक माहिती बुधवारी उघडकीस आली आहे. ही बाब लक्षात येताच रामनगर पोलिसांनी पथक पाठवून या मौलवींवर कारवाई सुरू केली.यामध्ये ११ तुर्कस्तानी आणि दिल्ली, आसाम व तामिळनाडू येथील प्रत्येकी एका मौलवीचा समावेश आहे. विदेशातून हे मौलवी कोणत्या हेतूने चंद्रपुरात आले याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलीस त्यांचा कसून तपास करीत आहे.
पोलीस सुत्रानुसार ३ मार्च रोजी१४ मौलवी तुर्कस्तानातून चंद्रपुरात दाखल झाले. याबाबत जिल्हा प्रशासनाला अंधारात ठेवून मशिदीमध्ये त्यांना आश्रय दिला गेला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलीस प्रशासनही बुचकाळ्यात पडल्याचे समजते. कोरोनाने जगात थैमान घातले आहे. आता भारतातही कोरोनाची व्याप्ती वाढत असून यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे. असे असताना हे मौलवी ३ मार्चपासून चंद्रपुरातील एका मशिदीत लपून असल्याची कुणकुण काही नागरिकांना लागताच त्यांनी पोलिसांना या गंभीर बाबीची सूचना दिली.


