वणी:(प्रति)(हेमंत थेरे): पहाटे चार ते पाचच्या सुमारास निलजई-घुग्गुस रोडवर सदर घटना घडली. यामध्ये मृतकाचे नाव जावेद शेख असून तो वणी शहरातील खलबडा येथील रहीवाशी आहे. सदर घटनेची नोंद शिरपुर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. भल्या पाहाटे मृत व्यक्ती डी.पी. वर का चढला? या बाबत संब्रमावस्था आहे. अनेक चर्चा ला उधान आहे. प्राप्त् माहीती नुसार आज पहाटे जावेद शेख हा तरूण त्याच्या एका सहका-याला सोबत घेऊन निलजई घुग्गुस रोडवर गेला.त्याने पोल वर चढुन एक स्पॅनचा तार काढला व दुसरा तार काढत्या वेळी त्यातील फेज सुरू असल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसुन तो जागीच ठार झाला. सदर लाईन ही डब्लु.सी.एल ची असुन डमी लाईन आहे.
Related Articles
पहिल्यांदाच तयार होणार चंद्रपूर जिल्ह्याचे मराठी गॅझेटिअर
नागरिकांच्या योग्य सुचना व अभिप्रायसाठी 1 महिना जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध पत्रकार परिषदेत जिल्हाधिका-यांची माहिती चंद्रपूर : ‘गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच […]
प्रत्येक कार्यकर्ता पोहोचवेल भाजपाचा विचार सर्वदूर-ना. श्री. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : भाजपाचा कार्यकर्ता एकमेकांना प्रोत्साहन देणारा आहे. भाजपाचा विचार सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य तो निश्चितपणे करेल, असा ठाम विश्वास राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सोमनाथ ( मुल )येथे मोदी @9 जनसंपर्क अभियानाअंतर्गत आयोजित ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, टिफिन बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी […]
माहेरी आलेली महिला वीज पडून ठार
भद्रावती (ता.प्र.)वडिलांच्या भेटीसाठी माहेरी आलेली महिला ठार होण्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान भद्रावती तालुक्यातील मासळ (विसापूर) येथे घडली. बुधवारी सायंकाळी मेघगर्जने सह जोरदार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. यावेळी मासळ (विसापूर)या गावात माहेरी आलेली अर्चना संजय चंदे (३५) नामक महिला गावाला लागूनच असलेल्या वडिलांच्या शेतात भाजीपाला आणण्याकरिता गेली असता वीज पडून ठार झाली.



