चंद्रपूर(का.प्र):दि.१९ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करीत असलेल्या अन्य राज्यातील मजुरांना आपल्या गावी,आपल्या राज्यात, परत जायचे असेल तर त्यांनी आपल्या नावाची नोंद संबंधित वेबसाईट वर करावी, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सध्या काम करत असलेल्या अन्य राज्यातील मजुरांना आपल्या स्वतःच्या राज्यात परत जायचे, असेल तर त्यांनी आपली नोंद https://migrant.mahabocw.in/migrant/form या वेबसाईटवर करण्याचे,आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.मायग्रंट फॉर्म नावाची ही वेबसाईट असून https://migrant.mahabocw.in/migrant/form यावर आपल्या नावाची नोंद करणे आवश्यक आहे.ज्या ठिकाणी अन्य राज्यातील कामगार कार्यरत असतील त्या आस्थापनाच्या प्रमुखांनी देखील कामगारांना या साठी मदत करावी, असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.
Related Articles
जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ
*एका महिन्यात जिल्ह्यात ७ निर्घृण हत्या झाल्या गंभीर बाब आहे. यावर पालकमंत्र्यांचे मत पहा व्हिडीओ *तसेच जिल्ह्यात दारूबंदी होणार कि नाही. याबाबत पालकमंत्र्यांचे म्हणणे पहा हा व्हिडीओ
बारावीचा निकाल जाहीर…
९४.२२ टक्के उत्तीर्ण… mahresult nic in Maharashtra HSC ऑनलाइन निकाल 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज महाराष्ट्र बोर्डाचा 12वी निकाल जाहीर केला. आज दुपारी 1 नंतर निकाल तपासता येतील. एक वाजल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावी बोर्डाची लिंक सक्रिय होईल. यंदा पुण्यात ९३.६१ टक्के, नागपूरमध्ये ९६.५२ टक्के, औरंगाबादमध्ये ९४.९७ […]
बल्लारपूरात आत्महत्येचे सत्र सुरूच : विद्यानगर वॉर्डात 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात नुकतीच काही दिवसांपूर्वी विद्यानगर वॉर्डातच ऑटोरिक्षा चालक असलेल्या सुशांत भीमराव झाडे यांनी अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा विद्यानगर वार्डातीलच पंचशील चौक परिसरातील अनिल नारायण देवगडे वय-20 वर्ष, यांनी आपले राहते घरी मंगळवार ला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या […]


