चंद्रपूर(का.प्र):दि.१९ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करीत असलेल्या अन्य राज्यातील मजुरांना आपल्या गावी,आपल्या राज्यात, परत जायचे असेल तर त्यांनी आपल्या नावाची नोंद संबंधित वेबसाईट वर करावी, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सध्या काम करत असलेल्या अन्य राज्यातील मजुरांना आपल्या स्वतःच्या राज्यात परत जायचे, असेल तर त्यांनी आपली नोंद https://migrant.mahabocw.in/migrant/form या वेबसाईटवर करण्याचे,आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.मायग्रंट फॉर्म नावाची ही वेबसाईट असून https://migrant.mahabocw.in/migrant/form यावर आपल्या नावाची नोंद करणे आवश्यक आहे.ज्या ठिकाणी अन्य राज्यातील कामगार कार्यरत असतील त्या आस्थापनाच्या प्रमुखांनी देखील कामगारांना या साठी मदत करावी, असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.
Related Articles
*चंद्रपूर जिल्ह्यातील आता बाधितांची संख्या १२५ वर*
चंद्रपूर (का.प्र ):चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ७ पॉझिटिव्ह बाधितांची भर पडली आहे. यामध्ये ३ राज्य राखीव पोलीस दलाचे जवान ( एसआरपीएफ ) आहेत. ते पुणे येथील मूळ निवासी आहेत. त्यामुळे त्यांची चंद्रपूरच्या बाधितांमध्ये गणना होणार नाही. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह असला तरी कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या […]
चंद्रपुरात आतापर्यंतचा कोरोनाचा नवा रेकार्ड
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४०१ रुग्ण कोरोना बाधित * जिह्ल्यातील आतापर्यंतची सर्वाधिक जास्त रुग्ण संख्या *जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण कोरोना बाधितांची संख्या- ५२५३ * जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्याची संख्या- २८५७ *तसेच सध्या २७२२ रुग्ण उपचार घेत आहेत. *आतापर्यंतची मृत्यू झालेल्याची संख्या ५७ जिल्ह्यातील (५४) बाहेरील (४) * जनतेनी शारीरिक अंतराचे पालन करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. […]
आरोग्य सुविधांवर एक कोटीच्या खर्चाची परवानगी द्या -आ.सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून विशेष बाब म्हणून एक कोटी रूपयाचा निधी खर्च करण्याची परवागनी देण्यात यावी, याबाबत जिल्हाधिकारी यांना सर्वाधिकार प्रदान करावे, अशी मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री […]



