गडचिरोली(DIO) : काल 72 एसआरपीएफ कोरोना बाधित आढळून आल्यानंतर रात्री उशिरा पून्हा २ जवान बाधित असल्याचे आढळून आले. तर भामरागड येथील विलगीकरणातील एकजण चेन्नई येथून आलेला मजूर, चामोर्शी येथील होम विलगीकरणात असलेला बँगलोर येथून आलेला व्यक्ती व चामोर्शी येथीलच मुंबई वरून परतलेल्या एका कुटुंबातील 9 वर्षाची मुलगी कोरोना बाधित आढळून आली ती संस्थात्मक विलगीकरणात होती. त्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.तसेच आज सकाळी चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथील घरातील सदस्याच्या अंतिम विधीला हैद्राबाद हून आलेल्या कुटुंबाच्या संपर्कामूळे कुटुंबातीलच दोन पुरूष व एक महिला कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. रात्री आणि सकाळी नव्याने आढळलेल्या ८ नवीन बाधितांमूळे जिल्ह्यातील व जिल्हयाबाहेरील सक्रिय रूग्णांची संख्या 206 झाली. तर जिल्हा व जिल्हयाबाहेरील मिळून एकूण रूग्णांची संख्या 338 झाली. आत्तापर्यंत 131 रूग्ण बरे झाले तर १ मृत्यू आहे.


