गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४
गडचिरोली प्रतिनिधी :दि. २५ मे वेळ दु. ३. ०० वा. जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या आणखी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. नव्याने आढळलेले रुग्ण एटापल्ली व भामरागड तालुक्यातील आहेत. सर्वांना एटापल्ली येथील संस्थात्मक क्वारंटाइन सेन्टरमध्ये ठेवण्यात आलेले होते असे आरोग्यविभागाने कळविले आहे.



