महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण

मुंबई प्रतिनिधी : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सद्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यासाठी तयारी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील दुसरे नेते ठरले आहेत. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. मुबईतील त्यांचा कार्यालयातून दुजोरा दिला आहे. अशोक चव्हाण हे गेल्याच आठ्वड्यामध्ये मुंबईहून नांदेडला गेले होते. तेथे त्याची चाचणी करण्यात आली असता अहवालात संसर्ग झाल्याचे निषन्न झाले. त्याची प्रकृती चांगली असून त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.