चंद्रपूर (का.प्र.) गोंदिया-आमगाव मार्गावरील दहेगाव गाव शिवारातील वळणावर टायर फुटल्याने अनियंत्रित कार झाडावर जाऊन आदळून पलटली.या घटनेत कार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हि घटना बुधवारी ता. २७ ला दुपारच्या सुमारास घडली. प्रशांत दौलतराव खनके (४२)रा. तुकूम चंद्रपूर असे मृताचे नाव आहे.मध्य प्रदेश राज्यातील लांझी येथील नातेवाईकाच्या अंत्य यात्रेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर येथून कार क्रं. एम एच ३४/ए एम -३०५० ने प्रशांत खनके हा जात होता.गोंदिया-आमगाव मार्गावरील दहेगाव वळणावर कारचे टायर फुटल्याने अनियंत्रित कार झाडावर जाऊन आदळली व पालटली. या घटनेत प्रशांत खनके यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद आमगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Related Articles
चंद्रपूर शहरातील हे 5 मार्ग होणार चकाचक
चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांची दुरदर्शा झाली आहे. त्यामुळे हे मार्ग तयार करण्यासाठी 20 कोटी रुपयांची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. दरम्याण त्यांच्या मागणीला यश आले असुन चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गांच्या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यामुळे लवकरच या कामांना आता […]
२१ दिवस लॉकडाउन; जनजीवन ठप्प
चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील २० मजूर तेलंगानात अडकले असून, या मजूरांना तेलंगणातील गावकNयांनी गावाबाहेर काढल्याने हे मजूर अडचणीत आले आहे. या मजूरांना आपल्या गावापर्यंत प्रशासनाने सुखरूप आणावे यासाठी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी महाराष्ट्र आणि तेलंगाना प्रशासनासोबत पाठपुरावा करीत आहे. पवनपार, गुंजेवाही, खैरी, तांबेगडी मेंढा येथील २० मजूर असून, ते तेलंगानातील कोट्टागुड्डम […]
‘झेडपी चांदा स्टुडंट ॲप’ जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात
सीईओ विवेक जॉन्सन यांच्या प्रेरणेतून ॲप विकसित चंद्रपूर : शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी नवनवीन प्रयत्न सातत्याने केले जातात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रेरणेतून ‘झेडपी चांदा स्टुडन्ट अॅप’ (ZP CHANDA STUDENT APP) तयार करण्यात आले आहे. लवकरच हे ॲप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करून देण्यात […]



