चंद्रपूर (का.प्र.) गोंदिया-आमगाव मार्गावरील दहेगाव गाव शिवारातील वळणावर टायर फुटल्याने अनियंत्रित कार झाडावर जाऊन आदळून पलटली.या घटनेत कार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हि घटना बुधवारी ता. २७ ला दुपारच्या सुमारास घडली. प्रशांत दौलतराव खनके (४२)रा. तुकूम चंद्रपूर असे मृताचे नाव आहे.मध्य प्रदेश राज्यातील लांझी येथील नातेवाईकाच्या अंत्य यात्रेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर येथून कार क्रं. एम एच ३४/ए एम -३०५० ने प्रशांत खनके हा जात होता.गोंदिया-आमगाव मार्गावरील दहेगाव वळणावर कारचे टायर फुटल्याने अनियंत्रित कार झाडावर जाऊन आदळली व पालटली. या घटनेत प्रशांत खनके यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद आमगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Related Articles
सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता कोरोनाचे सावट कायम ; नागरिकांनी घरातच रहावे : जिल्हाधिकारी
* आवश्यक सेवांची दुकाने 7 ते 2 * अन्य दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 * रविवारी फक्त जीवनावश्यक दुकाने सुरू * दुचाकीवर केवळ 1 नागरिकाला मुभा * रिक्षामध्ये मागच्या सीटवर फक्त 2 व्यक्ती * 4 चाकी गाडी ; ड्रायव्हर आणि मागे 2 व्यक्ती * जिल्हा अंतर्गत आता पासची गरज नाही * जिल्हा बाहेर प्रवास […]
आपली नोकरी लोकांच्या सेवेसाठीच – तत्कालीन जिल्हाधिकारी गुल्हाने
प्रशासनातर्फे तत्कालीन जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिका-यांना निरोप चंद्रपूर : शासकीय कार्यालयात काम घेऊन येणारा व्यक्ती हा आपला वेळ खायला आला आहे, किंवा तो आपला शत्रृ आहे, अशी मानसिकता अधिकारी आणि कर्मचा-यांनी अजिबात ठेवू नये. त्यामुळे आपल्यामध्ये ताणतणाव वाढतो. बदलत्या काळानुसार शासकीय सेवेत असणा-यांनी गतिमान काम करण्यासोबतच प्रत्यक्ष फिल्डवर जाणे, लोकांना भेटणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणेसुध्दा महत्वाचे […]
चंद्रपूर जिल्ह्यात 71 नव्याने पॉझिटिव्ह ; तर दोन बाधितांचा मृत्यू
*जिल्ह्यात मागील 24 तासात 119 कोरोनामुक्त *आतापर्यंत 15,252 बाधित झाले बरे *उपचार घेत असलेले बाधित 2,191 चंद्रपूर, दि. 16 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 119 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 71 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.आज मृत झालेल्या बाधितामध्ये कटवाल, ता. भद्रावती येथील […]



