चंद्रपुर

शेतकऱ्यांचे चंद्रपूर-आदिलाबाद महामार्ग चक्काजाम आंदोलन

चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूरात कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. बाजार समिती आणि CCI कापूस खरेदी करत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त करत चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील सोनूर्ली येथील खरेदी केंद्रावर चाललेली मनमानी त्यांनी आंदोलन करत उघड केली आहे. हजारो कापूस गाड्यांसह शेतकरी या केंद्रावर खोळंबले असून या केंद्रावर खरेदी बंद झाल्याची माहिती अचानक दिल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. तेलंगणात जाणारा महामार्ग रोखून धरत हे आंदोलन केले गेले असुन आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तत्काळ कापूस खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.