
*मनपा आयुक्तांना निवेदन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ईशारा
चंद्रपूर (का.प्र ):चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर येथील कंत्राटी घंटागाडी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेतली असून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. मनपा आयुक्तांनीही येत्या दिवसात मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन यावेळी मनपा आयुक्तांनी दिले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतांना देखील घंटागाडी कंत्राटी कामगार नित्यनियमाने आपले कर्तव्य बजावीत चंद्रपूर शहराला सुंदर व स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. असे असले तरी महानगरपालिकेच्या वतीने सदर कामगारांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामूळे त्यांच्या अनेक समस्या अद्यापही प्रलंबीत आहे. या सर्व समस्यांना घेऊन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्तांची भेट घेण्यात आली असून कामगारांच्या या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी मनपा आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून येत्या ८ दिवसात यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी विविध मागण्यांबाबतचे निवेदनही मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. नविन कंत्राटदारांकडे घंटागाडी कामगारांना कामावर घेण्यात यावे, जानेवारी २०२१ पासुन घंटागाडी कामगारांना किमान वेतन देण्यात यावा, नविन निवीदा प्रक्रियेला वेळ लागत असेल तर मनपा घंटागाडी कामगारांना जानेवारी महीन्यापासुन किमान वेतन देण्यात यावे आदि मागण्यांचा या निवेदनात समावेश असून मागण्या मान्य न झाल्यास घंटागाडी कामगारांसह आंदोलन करण्याचा ईशारा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर संघटक कलाकार मल्लारप, राहूल मोहुर्ले, करणसिंह बैस, नकुल वासमवार, दुर्गा वैरागडे, डोमाजी डोंगरे, कोडबा मून, प्रकाश जूमडे, गणेश मुद्दलवार, कीर्ती सिंग, रुपेश कजरीवाले आदिंची उपस्थिती होती.



