
चंद्रपुर :- स्कार्पीओ गाडिने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसुन असलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. सदर घटना दिनांक 13 रोजी रविवारला भद्रावती शहरातील सुमठाणा गावात भद्रावती चंद्रपूर हायवेवर घडली. यात शंकर धोंडू निकुरे यांचा मृत्यू झाला. या अपघातात कार्तिक मोहुर्ले हा ईसम गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी चंद्रपुर येथे हलविण्यात आले आहे. मृतक तथा जखमी कार्तिक मोहुर्ले हे दोघे आपल्या गावावरुन चंद्रपुर येथे काही कामानिमित्त आपल्या MH 34 BW 3449 या क्रमाकाच्या दुचाकीने चालले होते. भद्रावती शहरातील सुमठाणा परिसरात असतांना त्यांनी गाडी वळविली त्याच वेळेस मागुन येणाऱ्या MH 05 CM 1514 या स्कार्पीओ गाडिची जोरदार धडक बसली त्यात दुचाकीवर मागे बसलेल्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे.




