
चंद्रपूर (का.प्र) आज विलोडा या गावी तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे भिमराज बागेसर यांचे घरी झाडावर जखमी अवस्थेत घुबड आढळला. त्याला २० ते २५ कावळ्यांनी घेरले व टोचून मारायला लागले.घरच्या व्यक्तींनी कावळ्यांना हाकलून लावले. परन्तु तेव्हाच घुबड झाडावरून खाली पडले. त्यानंतर ही माहिती सार्ड संस्थेचे सदस्य व वनविभाग यांना देण्यात आली. यांना माहिती मिळताच सार्डचे सदस्य व वनकर्मचारी एकाच वेळी त्या ठिकाणी पोहोचले व घुबड़ास पकडले त्यावेळी वनकर्मचारी लाटकर तर सार्डचे सदस्य गणपतराव भोसकर, धोंडुजी केली. उर्काडे ,राजू सोनडवले, अमोल भोस्कर, सुभाष सोनुणे हे होते यांनी घुबडाला सुरक्षित पकडून वन कर्मचाèयाच्या स्वाधीन केले.
सदर घुबड हा पक्षी इंडियन इगल ऑऊल या जातीचा असून त्याचे शास्त्रीय नाव बुबो बेंगॉलेनसिस असे आहे.तो संपूर्ण भारतभर वास्तव्यास आढळतो. पूर्र्वी मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसायचा परंतु आता त्याचा अधिवास व अन्न याची समस्या झाल्यामुळे तो पक्षी दुर्मिळ होत चालला आहे. त्या वेळी गावकèयांनी सुद्धा मदत केली तेंव्हा विलोड्याचे पोलीस पाटील संतोषजी बागेसर, भीमराज बागेसर कल्पना बागेसर , बापुरावजी शेंडे हे उपस्थित होते यांनी सुद्धा मदत



