मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे….

नागपूर : एकनाथ शिंदेंच्या गटात कालपर्यंत असलेले नितीन देशमुख आज नागपूरमध्ये परतले आहेत. नागपूरमध्ये येताच त्यांनी धक्कादायक विधान केले आहे.
मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझी तब्येत चांगली आहे. मला तिथल्या पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेले आणि म्हणाले तुमच्यावर कारवाई करायची आहे. परंतु तेव्हा माझी तब्येत ठीक होती. मला हृदयविकाराचा झटका आला ही बातमी खोटी होती. वीस-पंचवीस लोकांनी मला जबरदस्ती इंजेक्शन दिले. मला माहिती नव्हतं माझ्या शरीरावर चुकीच्या प्रक्रिया करण्याचं त्या लोकांच षडयंत्र होतं” असा धक्कादायक आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान काल उस्मानाबादच्या कळंबचे आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदेंच्या गटातून पळून आल्याचे त्यांनी सांगितले होते. शिंदेंनी त्यांना कशापद्धतीने गुजरातच्या सिमेपर्यंत नेले याचा संपुर्ण कथानक त्यांनी सेना प्रमुखांना सांगितला. काल त्यांनी शिंदेंच्या गटातून धूम ठोकून थेट मातोश्री गाठली होती. मला वॉशरुमला थांबायचे आहे असे सांगून कैलास पाटील गाडीतून घाली उतरले आणि पळत सुटले. गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरुन त्यांनी कधी पायी, कधी दुचाकीवरुन लिफ्ट घेत तर कधी ट्रकमधून मुंबई गाठली होती.




