
चंद्रपूर : जंगलात तेंदूपता तोडायला गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात; मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ताडोबा च्या बफर मधील सीताराम पेठ जंगलातील घटना असून मृतक चं नाव जाईबाई जेंगठे (65) आहे, ही महिला ताडोबा लगत असलेल्या मोहूर्ली या गावातील रहिवाशी आहे. गावात घटनेची माहिती; पसरताच घटनास्थळावर एकच गर्दी केली, या घटने मुळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताचं वन अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले आहे. सद्या तेंदूपत्ता तोडण्याची सिजन सुरू झाली आहे. गावातील सर्व नागरिक जंगलात तेंदूपत्ता संकलन करायला जातात. या घटने मूळ अजून एकदा त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न समोर आला आहे.



