चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी यांना जलनगर वासियांच्या हितासाठी निवेदन सादर

चंद्रपूर शहरातील जलनगर वार्ड, उडिया मोहल्ला व सावरकर नगर येथील 49 नझुल घर धारकांना रेल्वे प्रशासन तर्फे नोटीस देण्यात आले आहे हे 62 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे हे चुकीचे असुन त्यासंदर्भात महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले त्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी जलनगर वार्ड,उडिया मोहल्ला व सावरकर नगर येथील भागाची मौका चौकशी करावी व अनेक वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या नझुल घर धारकांना स्थायी स्वरूपात जेथे सध्या स्थितीत निवास स्थान आहे तेथेच राहण्यासाठी कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,महामंत्री ब्रिजभूषन पाझारे,माजी उपमहापौर राहुल पावडे,महानगर सचिव राकेश बोमनवार, रामकुमार आकापेल्लीवार,अमित निरंजने,मनीष खापरे,महेश झिटे,सत्यम गाणार,रमेश चित्तलवार,जुबेर शेखबादल जैस्वाल,शुभम बुटले,बबन राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *