
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव तथा निवृत्त पोलीस अधिकारी एकनाथ कन्नाके यांच्या मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर-बल्हारपूर मार्गावरील अब्दुल कलाम गार्डनचा मागील भागात त्यांचा मृतदेह आढळला. ही आत्महत्या की घातपात ? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र हसमुख,प्रेमळ स्वभावाचा राजकारणी हरपल्याने राजकीय वर्तूळात दुख व्यक्त केले जात आहे.
प्राप्त माहीतीनुसार, निवृत्त पोलीस अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव एकनाथ कन्नाके हे हसमूख आणि प्रेमळ स्वभावाचे धनी होते. आदीवासी समाजाचे नेते ही त्यांची खरी ओळख होती. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारण आणि समाजसेवेवर अधिक भर दिला होता. आज चंद्रपूर-बल्हारपूर मार्गावरील अब्दुल कलाम गार्डनचा मागे त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
एकनाथ कन्नाकेनी बुधवारला फाशी घेतली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे घातपाताची शक्यता वर्तविली जात असल्याने, आत्महत्या की घातपात ? याबाबत गुढ कायम आहे. दरम्यान घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.




